माळीण गाव दुर्घटनाः पंतप्रधान मोदीही हळहळले

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या माळीण गावाव दु:खाचा डोंगर कोसळल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा हळहळले आहेत. मोदींनी ट्विटर या सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला आहे. तसंच याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. राजनाथ सिंह हे या घटनेचा आढावा घेण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत, असं मोदींनी ट्विट केलं आहे.

Updated: Jul 30, 2014, 06:59 PM IST
माळीण गाव दुर्घटनाः पंतप्रधान मोदीही हळहळले title=

नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या माळीण गावाव दु:खाचा डोंगर कोसळल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा हळहळले आहेत. मोदींनी ट्विटर या सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला आहे. तसंच याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. राजनाथ सिंह हे या घटनेचा आढावा घेण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत, असं मोदींनी ट्विट केलं आहे.

पाहू या काय केले मोदींनी ट्विट

Loss of lives in landslide in Pune dist. is saddening. Spoke to Rajnath ji & he would be travelling to Pune to take stock of the situation.

— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2014

 

बस ड्रायव्हरच्या सर्वात आधी लक्षात आलं (UPDATE 05.30 PM)

माळीण हे अख्ख गाव गाळाखाली गेलं आहे हे सर्वात आधी एसटी ड्रायव्हरला लक्षात आलं. सकाळची पहिली एसटी गावात आली, पण ड्रायव्हरला नेहमी दिसणार गाव जरा वेगळचं दिसलं आणि गावावर डोंगराचा गाळ मोठ्या प्रमाणात वाहून आलाय, आणि गावचं दबलंय हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने जवळच्या पोलिस स्टेशनला सकाळी साडेसातच्या सुमारास ही माहिती दिली.

बचाव कार्य वेगाने सुरू (UPDATE 05.16 PM)

माळीण गावातील बचाव कार्यासाठी पुण्यात कंट्रोल रूम बनवण्यात आलाय. घटनास्थळी गाळ काढण्याचं काम सुरू आहे. दोन ते तीन मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. कच्चा रस्ता असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. एनडीआरएफचे 3 हजार जवान घटनास्थळी आहेत. मात्र सर्वगावावर गाळ फिरल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे.(UPDATE 05.16 PM)

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात आता 160 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे घटनास्थळी पोहोचले आहेत.

घटनास्थळी जेसीबी मशीन मदतीसाठी पोहोचलं आहे.

भीमाशंकर कारखान्याच्या कामगारांनी मदतकार्य सुरू केलं आहे. (UPDATE 01.49 PM)

पुण्यातील आंबेगावमधील माळीण गाव पहाटे गाढ झोपेत असताना डोंगराचा एक अख्खा भाग कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. येथील ५० ते ६० घरांचे अख्यं गाव डोंगराखाली गाढले गेले. या मोठ्या दुर्घनेतील दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. हे गाव दुर्गम भागात असल्याने मदत यंत्रणा पोहोचण्यास विलंब लागत आहे. दरम्यान, लष्करी जवानांची मदत घेण्यात आली आहे. या ठिकाणी कंट्रोल रुम उभारण्यात आलाय.

आंबेगाव तालुक्यात दुर्गम भागात आदिवासी आणि मजूर लोकांची माळीण गावात वस्ती आहे. ७५० लोकसंख्या लोकवस्तीचे हे गाव आहे. ३० ते ३५ घरे गाढली गेल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी पहाटे दरड कोसळल्याने गावातील जवळपास ३०० लोक अडकल्याचे भीती व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पाऊस पडत आहे. त्यामुळेच ही मोठी दरड कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

माळीण गावात भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याचे कामगार आणि कर्मचारी मदतकार्य करीत आहेत. तसेच ग्रामस्थांनीही मदतकार्य सुरु केलेय. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यास उशीर झालाय. पोकलेन आणि जेसीबीची मदत घेण्यात आली. मात्र, परिसर दुर्गम असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. त्यातच पाऊस कोसळत अल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे.

एनडीआरएफची दोन पथके माळीण गावाच्या दिशेने रवाना झाली आहेत. मदत आणि बचावकार्याला सुरुवात झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.