जेव्हा मुस्लीम बहुल भागात लागले मोदी-मोदीचे नारे...

'मोदी-मोदी'चे लागले नारे

Updated: Aug 11, 2016, 12:07 PM IST
जेव्हा मुस्लीम बहुल भागात लागले मोदी-मोदीचे नारे... title=

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार जेव्हा मध्यप्रदेशमधील भाबराच्या रस्त्यांवरुन चंद्रशेखर आजाद यांच्या स्मारकाकडे जात होते तेव्हा मुस्लिम बहुल भागात गर्दीने  पीएमच्या ताफा घेरला आणि 'मोदी-मोदी'चे नारे लागू लागले. हे पाहून सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे देखील डोळे उंचावले.

भाबरा के मुस्लिम बहुल इलाके में जब घिरा पीएम का काफिला और फिर गूंजा...!

अचानक पंतप्रधान मोदींचा ताफा थांबला आणि कोणी काही समजू शकेल त्याआधीच पंतप्रधान मोदी गाडीतून उतरले आणि या लोकांमध्ये जाऊन पोहोचले. पीएम मोदींनी तेथे उपस्थित लोकांना निराश नाही केलं. त्यांच्या कारमधून उतरुन त्यांनी काही लोकांशी उत्साहाने भेट घेटली. पण अशा भागात पंतप्रधान थांबल्यामुळे सुरक्षा यंत्रणांना नक्कीच घाम सूटला असेल. त्यांच्या पुढचं आव्हान वाढलं असंच त्यांना वाटत असेल पण काहीही अनुचित प्रकार नाही घडला. मोदींच्या भेटीनंतर तेथील लोकांनी ही आनंद व्यक्त केला.