'डॉक्टरेट' मिळवणारी महिला बनली 'तांत्रिक'

उज्जैन : पीएचडी करून डॉक्टरेट मिळवणारी एक महिला 'तांत्रिक' म्हणून काम करते असं ऐकलं तर... तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे. 

Updated: Jan 30, 2016, 02:58 PM IST
 'डॉक्टरेट' मिळवणारी महिला बनली 'तांत्रिक' title=

उज्जैन : पीएचडी करून डॉक्टरेट मिळवणारी एक महिला 'तांत्रिक' म्हणून काम करते असं ऐकलं तर... तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे. 

मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात राहणाऱ्या शिवानी दुर्गा या महिलेनं अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातून पीएचडीचं शिक्षण घेतलंय. 'सर्वेश्वरी शक्ती इंटरनॅशनल आखाड्या'ची संस्थापक असलेल्या शिवानीच्या म्हणण्यानुसार तिची आजी खूप अध्यात्मिक होती. हिंदू समाजात महिला स्मशानात जात नाहीत. परंतु, शिवानीची आजी मात्र लहान शिवानीला स्मशानात नेत असे. स्मशानात नेऊन जळणाऱ्या चितेला प्रणाम करुन मनुष्याच्या जीवनाचे हेच अंतिम सत्य असल्याचंही तिनं तिच्या आजीकडूनच ऐकलं होतं.  

परिवाराच्या विरोधानंतरही शिवानीने नागनाथ योगेश्वर गुरुजींकडून अघोरीचं शिक्षण घेतलंय आणि ती स्मशानात जाऊन शव साधनाही केली.

शिवानी दुर्गा यांना अघोरी विद्येसोबतच पाश्चात्य लोकांच्याही काही रहस्यमय विद्यांचे ज्ञान आहे. शिवानी यांचे जगातील अनेक देशांत शिष्य आहेत.

शनी शिंगणापूर विषयावरही शिवानी या महिलांना चौथऱ्यावर प्रवेश देण्याच्या पक्षात आहेत. सनातन काळात तयार केलेले नियम आता बदलले पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं आहे.