पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा पेट्रोलपंप चालकांचा निर्णय

देशभरातील 56 हजार पेट्रोलपंप चालकांनी 3 आणि 4 नोव्हेंबरला पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल, डिझेलचा पंपामध्ये तुटवडा जाणवू शकतो. या निर्णयाचा फटाक ग्राहकांना बसणार आहे. कारण तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल खरेदीच न केल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. 

Updated: Nov 2, 2016, 04:21 PM IST
पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा पेट्रोलपंप चालकांचा निर्णय title=

मुंबई : देशभरातील 56 हजार पेट्रोलपंप चालकांनी 3 आणि 4 नोव्हेंबरला पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल, डिझेलचा पंपामध्ये तुटवडा जाणवू शकतो. या निर्णयाचा फटाक ग्राहकांना बसणार आहे. कारण तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल खरेदीच न केल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. 

3 आणि 4 तारखेला पंपामध्ये जेवढा साठा शिल्लक आहे तेवढाचा साठा विक्रीकरून पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 5 नोव्हेंबरपासून एकाच शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 9 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंतच पंप सुरू ठेवण्याच निर्णय फामपेढाने घेतला आहे. तेल कंपन्या पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं फामपेढाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितलंय. तसेच तेल कंपन्यांनी डिलर्स कमिशन नीट ठरवले नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.