तलाक, तलाक, तलाक... 11 वर्षांचं नातं रस्त्यावरच तुटलं!

राजस्थानच्या जोधपूरमध्ये पत्नीला तलाक देण्याचा अजब प्रकार समोर आलाय. जोधपूरमध्ये एका पतीनं रस्त्यावर उभं राहूनच तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हटलं... आणि 11 वर्षांचं साताजन्माचं नातं एका झटक्यात तुटलं.

Updated: Nov 2, 2016, 04:18 PM IST
तलाक, तलाक, तलाक... 11 वर्षांचं नातं रस्त्यावरच तुटलं! title=

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये पत्नीला तलाक देण्याचा अजब प्रकार समोर आलाय. जोधपूरमध्ये एका पतीनं रस्त्यावर उभं राहूनच तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हटलं... आणि 11 वर्षांचं साताजन्माचं नातं एका झटक्यात तुटलं.

आपल्या पतीला मुलगा हवा होता, परंतु आपल्याला मुलगी झाल्यामुळे पतीनं आपल्याला 'तलाक' दिल्याचं पत्नीचं म्हणणं आहे. तुला माझ्या घरात ठेवायचं नाही म्हणत पती इरफाननं आपल्या पत्नीला रस्त्यावरच सगळ्यांसमोर तीन वेळा तलाक म्हणत बाजुला केलं. 

जोधपूरच्या शास्त्रीनगर क्षेत्रात राहणाऱ्या इरफानचा निकाह 11 वर्षांपूर्वी याच भागात राहणाऱ्या फराह नावाच्या एका युवतीशी झाला होता. विवाहानंतर अनेक वर्ष एकत्र राहूनही त्यांना मूलबाळ झालं नाही. मात्र, सात वर्षानंतर या जोडप्याला एक मुलगी झाली. त्यानंतर मात्र या दोघांचं नातं हेलकावे खाऊ लागलं. मुलगा हवा होता परंतु, मुलगीच झाली म्हणून फराहला 

काही दिवसांपूर्वी सासरच्या मंडळींनी फराहला एका लग्नासाठी पाठवलं होतं. परत आल्यानंतर मात्र तिच्यासाठी घराचे दरवाजे कायमचे बंद झाले होते. पती इरफान आल्यानंतर त्यानं आपल्या आई, नातेवाईक आणि इतर मंडळींसमोर घरासमोरच्या रस्त्यावरच आपल्या पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत हे नातं संपुष्टात आल्याचं जाहीर केलं. 

यानंतर मात्र फराहनं अशा पद्धतीचा तलाक स्वीकार करणार नसल्याचं म्हटलंय. आपल्या हक्कासाठी तिनं लढण्याचा निर्णय घेतलाय.