नोटबंदीनंतर आता पेट्रोल-डिझेलची धक्कादायक बातमी

नोटबंदीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी एक धक्कादायक बातमी येण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 7, 2016, 05:16 PM IST
नोटबंदीनंतर आता पेट्रोल-डिझेलची धक्कादायक बातमी title=

नवी दिल्ली : नोटबंदीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी एक धक्कादायक बातमी येण्याची शक्यता आहे. क्रिसिलने जारी केलेल्या रिपोर्टनुसार पुढील ३ ते ४ महिन्यात पेट्रोलचे दर पाच ते आठ टक्के आणि डिझेलची किंमतही ६ ते ८ टक्के वाढणार आहे.

कारण मागील आठवड्यात तेल उत्पादक देशांचा संघ ओपेकने, कच्च्या तेलाचं उत्पन्न दररोज १२ लाख बॅरलने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रिसिल यांनी म्हटलं आहे, ओपेक ने कमी उत्पन्न घेण्याचा निर्णय घेकल्याने कच्च्या तेलाच्या किमती मार्च २०१७ पर्यंत वाढून ५० ते ५५ टक्के प्रति बॅरल होऊ शकतात.

जर ही किंमत ६० डॉलर प्रति बॅरल झाली, तर असं म्हणतात की, पेट्रोल ८० रूपये आणि डिझेल ६८ रूपयांवर जाऊन पोहोचेल. मात्र ओपेकने खरोखर प्रतिदिन १२ लाख बॅरल उत्पन्न कमी केलं तरच हे होऊ शकतं.

पुढे क्रिसिल असंही म्हणतात, की जेवढी अंतर्गत मागणी आहे, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेत कमी वाढ झाली आहे. ज्यामुळे पेट्रोल-डिझेलचा खप कमी झाला आहे. मात्र बाजारात पुन्हा नगदी नोटा आल्यानंतर पुन्हा याला वेग येणार आहे.

रिपोर्टमध्ये म्हटलंय की, कच्च्या तेलाचे दर ५० डॉलरच्या वर जातील.