लुटारू सरकारमधून लोकांची सुटका : भाजप

लोकांची मागील लुटारू सरकारमधून सुटका झाली, मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त लोक आनंदी आहेत,  असं भाजपाने म्हटले आहे. 

Updated: May 27, 2015, 06:52 PM IST
लुटारू सरकारमधून लोकांची सुटका : भाजप title=

नवी दिल्ली : लोकांची मागील लुटारू सरकारमधून सुटका झाली, मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त लोक आनंदी आहेत,  असं भाजपाने म्हटले आहे. 

"राहूल गांधी तुमच्या शुभेच्छांबद्दल आभार, आम्ही एक वर्ष पूर्ण केल्याने लोक आनंदी आहोत, त्यांची लुटारू सरकारमधून सुटका झाली आहे‘ असे भाजपा प्रवक्ते पात्रा यांनी म्हटले आहे. 

मंगळवारी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त "सुटाबुटातील सरकारला जन्मदिनाच्या शुभेच्छा‘ असे म्हणत टीका केली होती. तसेच "यानिमित्ताने मी सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी असेच सुरु ठेवले, तर त्यांना पाचवेळा जन्मदिन साजरा करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी बोलणे सोडून कामाला लागावे‘ असेही राहूल यांनी पुढे म्हटले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.