लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण ३६८ पदांसाठी थोडे थोडके नव्हेत तब्बल २३ लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी चक्क २५५ पीएच डी पदवीप्राप्त आहेत.
थेट मुलाखतीने भरती प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यामुळे या भर्तीसाठी ४ वर्षे पेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांचे म्हणणे आहे की, उत्तर प्रदेशमध्ये नोकरी मिळत नाही. त्यामुळे शिपाईची नोकरी बरी. शिपाईपदासाठी दोन पात्रता निकष आहेत. एक म्हणजे तो पाचवी पास असावा आणि दुसरी म्हणजे त्याला सायकल चालवता आली पाहिजे.
३६८ रिक्त जागांसाठी २३ लाख अर्ज आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये २१.५ कोटी लोक राहतात. याचाच अर्थ एका पदासाठी ९३ लोकांनी शिपाईपदासाठी अर्ज केलाय. २५५ पीएच डी पदवी धारक आहेत. २ लाख २२ हजार बीटेक पदवीधारक असून एम. एससी, एम कॉम, बी. एस्सी, बी. कॉम आणि एम. ए. पदवी धारकांचा समावेश आहे.
शिपाई पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर आलेल्या अर्जांची मोजणी केल्यानंतर धक्कादायक बाब पुढे आली. दरम्यान, ५३ हजार लोक पाचवी पास आहेत. तर २० लाख उमेदवार सहावी ते १२ वी पास आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.