डिझेल ५ रुपयांनी आणि LPG गॅस २५० रुपयांनी महागणार?

सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढवण्याची शिफारस किरीट पारीख समितीनं पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 30, 2013, 05:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढवण्याची शिफारस किरीट पारीख समितीनं पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे.
पारीख यांनी आज पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी आपला अहवाल सादर केला. यात सबसिडाईज्ड गॅसची संख्या ९ वरून ६ करण्याची तसंच सिलेंडरचे दर २५० रुपयांनी वाढवण्याची शिफारसही यात करण्यात आली आहे. केरोसीनचे दरही ४ रुपये प्रति लीटरने वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे.
यापूर्वी २८ ऑक्टोबर रोजी किरीट पारेख समितीने डिझेलच्या किमती ४ ते ५ रुपयांनी वाढवण्याची शिफारस केली होती. स्वयंपाकाच्या गॅसच्या व्यापाराची समानता मूल्याचा फॉर्म्युला तसाच ठेवण्याची मागणी केली आहे.
सरकार सब्सिडीचा भार कमी करण्यासाठी डीझेल, गॅसच्या किमती वाढवण्याच्या विचारात आहे. गेल्या वर्षी वित्तमंत्रालयाने रिफायनरी कंपन्यांना निर्यातीतून मिळणाऱ्या किमतीएवढी किंमत देण्याचा विचार सरकार करत होतं. नवी शिफारस विचारात घेतल्यावर गेल्या आर्थिक वर्षात १,६१,०२९कोटी रुपयांच्या अनुदानातून १७,६१८ कोटी रुपये कमी होतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.