पर्रिकरांचे सात प्लस पॉईंट

Updated: Nov 9, 2014, 12:14 PM IST
पर्रिकरांचे सात प्लस पॉईंट  title=

 

 

नवी दिल्ली : पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होते.अशी काय गोष्ट आहे ज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्रिकरांना केंद्रात बोलावले. 
1 पेहराव, वागणूक आणि साधी राहणीमान यामुळे पर्रिकरांची सर्वसामान्यांपासून ते राजकीय वर्तुळात एक सर्वसामान्यांचा नेता म्हणून छाप पडली आहे. 
2 राजकारणात पहिल्यापासून मिस्टर क्लिन ही प्रतिक्रिया त्यांनी आतापर्यंत जपून ठेवली आहे. निवडणुकीदरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षासाठी वर्गणी जमा केली, ही बाब कौतुकास्पद समजली जातेय.
3 पर्रिकर दिवसातून 18 तास काम करतात. प्रत्येक फाईल निरखून पाहतात. स्पष्टपणे योग्य तो शेरा मारतात, ते एका जबाबदार नेत्याची जाणीव करून देतात.
4 पर्रिकरांचे स्नेही सांगतात ते प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करतात. समाधानपूर्वक योग्य निर्णय घेतात.
5 पर्रिकरांचे आतापर्यंतचे निर्णय लोकविरोधी ठरलेले नाहीत, त्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत आहे.
6 पर्रिकरांची भाषण शैली त्यांच्या बजेट भाषणांमध्ये दिसून येते.
7 पर्रिकरांची जेव्हा स्तुती होते, तेव्हा ते अगदी भावूक होतात. पक्षाचा विश्वास त्यांच्यासाठी अमुल्य आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे संघाच्या नजरेत ते एक विश्वासाचे नेते आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.