पेप्सिको वापरणार फळांचा रस

कोकाकोला आणि पेप्सी आपल्या ड्रिंक्समध्ये आता फळांचा पल्प वापरणार आहे. या कंपन्यांना फळांचा रस वापरण्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना दिली होती.

Updated: Nov 9, 2014, 10:53 AM IST
 title=

नवी दिल्ली : कोकाकोला आणि पेप्सी आपल्या ड्रिंक्समध्ये आता फळांचा पल्प वापरणार आहे. या कंपन्यांना फळांचा रस वापरण्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना दिली होती.

या सूचनेला प्रतिसाद देत कोकाकोला कंपनीनेही फळांचा रस वापरण्यास सुरूवात केली आहे.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये हा पल्प वापरला जाणार आहे. उन्हाळा सुरू होण्याआधी फळांचा रस असणारी शितपेय बाजारात विक्रीसाठी येतील असा अंदाज आहे. 

या नव्या उत्पादनांमुळे देशातील फळ बागायातदारांना फायदा होणार आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर शीतपेय विकली जातात. पेप्सी, कोक या कंपन्या अब्जावधींची उलाढाल करतात. 
या कंपन्यांनी केवळ 5 टक्के फळांचा रस आपल्या शितपेयांमध्ये मिसळला, तर इथल्या शेतकऱ्यांना अन्य कुठेच जाण्याची गरज भासणार नाही. 

अमेरिका दौऱ्यात पेप्सी, कोकच्या अधिकाऱ्यांपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव ठेवला होता, त्यावर कोकने सकारात्मक पावले उचलली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.