भारतीय जवानाचे शिर कापून पाकिस्तानी सैनिकांनी नेले

पाकिस्तानी सैनिकांचे कौर्य काल पुन्हा एकदा दिसून आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत ६०० मीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.

Updated: Jan 9, 2013, 11:23 AM IST

www.24taas.com, जम्मू
पाकिस्तानी सैनिकांचे कौर्य काल पुन्हा एकदा दिसून आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत ६०० मीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. पाक सैनिकांनी जवानांची गळा कापून हत्या तर केलीच, शिवाय एकाचे मुंडके त्यांनी सोबत नेल्याचेही वृत्त आहे. अन्य दोन जवान जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश करुन पेट्रोलिंग करणा-या भारतीय सैनिकांवर हल्ला केला. यामध्ये दोन भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. तर दोन सैनिक जखमी झाले आहेत. जम्मूच्या पूंछ भागातल्या मेंढर इथं ही घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानी सैनिकांनी या दोघा भारतीय सैनिकांना ठार केल्यानंतर त्यांचं डोकं धडापासून वेगळं केलं आणि त्यातील एकाचं डोकं घेऊन परत गेले.
एलओसी पार करून १०० मीटर आत पाकिस्तानी सैनिक घुसले होते. या हल्ल्यात दोन सैनिक जखमीही झाले आहेत. लांस नाईक सुधाकर सिंग आणि हेमराज या हल्ल्यात शहीद झाले आहेत. सरकारनं फक्त शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं सांगितलंय.