हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानी उच्चायुक्तातील अधिकाऱ्यास अटक

 हेरगिरीप्रकरणी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या एका अधिका-याला दिल्ली क्राईम ब्रँचनं ताब्यात घेतलं. मोहम्मद अख्तर असं या अधिका-याचं नाव आहे. 

Updated: Oct 27, 2016, 11:51 AM IST
हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानी उच्चायुक्तातील अधिकाऱ्यास अटक title=

नवी दिल्ली :  हेरगिरीप्रकरणी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या एका अधिका-याला दिल्ली क्राईम ब्रँचनं ताब्यात घेतलं. मोहम्मद अख्तर असं या अधिका-याचं नाव आहे. 

पाकिस्तानकरता हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन त्याला ताब्यात घेतलं गेलं. त्याच्याकडून भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रं जप्त करण्यात आली. 

दरम्यान चौकशीनंतर डिप्लोमॅटिक इम्युनिटी अंतर्गत त्याला सोडून दिलं गेलं. दरम्यान या हेरगिरी प्रकरणी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं भारतातले पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनाही समन्स बजावले आहेत.