पाकिस्तानात घरावर भारताचा झेंडा फडकवल्याने एकाला अटक

पाकिस्तानातील एका व्यक्तीने आपल्या घरावर भारताचा तिरंगा झेंडा लावल्याने पोलिसाने त्याला अटक केली आहे, तर न्यायालयानेही या व्यक्तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीबीसी उर्दूने ही बातमी प्रकाशित केली आहे.

Updated: Jan 27, 2016, 12:59 PM IST
पाकिस्तानात घरावर भारताचा झेंडा फडकवल्याने एकाला अटक title=

इस्लामाबाद : पाकिस्तानातील एका व्यक्तीने आपल्या घरावर भारताचा तिरंगा झेंडा लावल्याने पोलिसाने त्याला अटक केली आहे, तर न्यायालयानेही या व्यक्तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीबीसी उर्दूने ही बातमी प्रकाशित केली आहे.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील ओकाडा शहर पोलिसांनी या व्यक्तीविरोधात कारवाई केली आहे. सदर नावाच्या पोलिस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यानेही याबाबतीत दुजोरा दिला आहे. उम्र दराज असं या व्यक्तीचं नाव आहे.

या व्यक्तीने आपल्या घरावर तिरंगा फडकवल्याची बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी, इनकम टॅक्स डिपार्टमेंटप्रमाणे त्याच्या घरावर धाड टाकली आणि चौकशी सुरू केली आहे.

उम्र दराज विरोधात पाकिस्तानी कायदा 16 एमपीओ आणि 123ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उम्र दराजने म्हटलं आहे की, टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहलीचा मी फॅन आहे, आणि त्यासाठी आपण भारतीय झेंडा घरावर फडकवला. अखेर उम्र दराजने आरोपांपासून वाचवण्यासाठी विराट कोहलीवर नारळ फोडलंय की, तो खरोखर त्याचा फॅन आहे, हे अजून समजू शकलेलं नाही.