ओबामांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन त्यांचे आभार मानले. 

Updated: Jan 19, 2017, 02:11 PM IST
ओबामांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन त्यांचे आभार मानले. 

बुधवारी संध्याकाळी ओबामांनी मोदींना फोन केला आणि दोन्ही देशांदरम्यानच्या मजबूत संबंधांसाठी आभार मानले. यावेळी त्यांनी मोदींच्या कार्यकाळात संरक्षण, नागरी अणुऊर्जा तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्परसंबंध वाढवण्यावर भर दिल्याबद्दल मोदींचे आभार मानले. 

यावेळी त्यांनी २०१५च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती याची आठवणही काढली. तसेच ६८व्या प्रजासत्ताकदिनाच्याही शुभेच्छा दिल्या. 

बराक ओबामा यांचा कार्यकाळ आज संपतोय. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेणार आहेत.