नवी दिल्ली : जलईकट्टूसंबंधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तसंच जलईकट्टूबाबत अध्यादेश काढण्याची परवानगीही त्यांनी यावेळी मागितली. तर सरकारची पुनर्विचार याचिकाही कोर्टानं फेटाळून लावलीय.
तर दुसरीकडे तामिळनाडूत प्रसिध्द असणा-या जलाईकट्टू या बैलांच्या खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिकांचे आंदोलन सुरुच आहे. पोंगलच्यावेळी खेळल्या जाणा-य़ा खेळावर 2014मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या बंदिविरोधात अनेक याचिका न्यायलयात दाखल करण्यात आल्या होत्या.
त्यातल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं तात्काळ निर्णय देण्यास नकार दर्शवला होता. तरीही यावर्षी जलाईकट्टूचं थोडयाफार प्रमाणात आयोजन करण्यात आलं. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी या भेटीनंतर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.