रेल्वे तिकीट आता फोनवरूनही होणार 'कॅन्सल'

आता फोनवरूनही रेल्वे तिकीट होणार 'कॅन्सल' करता येणार आहे.

Updated: Mar 28, 2016, 07:14 PM IST
रेल्वे तिकीट आता फोनवरूनही होणार 'कॅन्सल' title=

नवी दिल्ली : आता फोनवरूनही रेल्वे तिकीट होणार 'कॅन्सल' करता येणार आहे. यासाठी आता येत्या १ एप्रिलपासून केवळ एका फोनवर आरक्षित तिकीट रद्द करता येणे शक्य आहे. 

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  फोनद्वारे तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना 139 क्रमांकावर फोन करावा लागेल. त्यानंतर आरक्षित तिकिटाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर प्रवाशांना एक पासवर्ड मिळेल. 

पासवर्ड मिळाल्यानंतर त्याच दिवशी तिकीट काउंटरवर जाऊन तो पासवर्ड सांगितल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत.

प्रवाशांना 'कन्फर्म' तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे तिकीट रद्द करण्याची रक्कम दुप्पट करणार असल्याची घोषणा केली होती.

रेल्वेने नियमांमध्ये बदल करूनदेखील प्रवाशांना आरक्षित तिकीट रद्द करण्यात अडथळे येत होते, त्यामुळे प्रवाशांना रद्द केलेल्या तिकिटाचे पैसे परत मिळत नव्हते.