नवी दिल्ली : जर तुम्ही कार अथवा बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असाल तर हे नक्की वाचून जा. कारण कदाचित तुम्हाला पेट्रोल न भरताच परतावे लागेल. नव्या रस्ते सुरक्षा नियमानुसार हे होऊ शकते.
रस्ते सुरक्षांच्या नव्या नियमानुसार जे लोक बाईक चालवाताना हेल्मेट घालतात अथवा कारचालक सीट बेल्ट लावतात त्यांनाच पेट्रोल दिले जाणार आहे. जर तुम्ही हेल्मेट अथवा सीटबेल्ट लावला नसेल तर पेट्रोल पंपवाले पेट्रोल भरण्यास मनाई करु शकतात.
या नियमांची अंमलबजावणी बंगालमध्ये सुरु झालीये. बंगालमधील एका जिल्हा मॅजिस्ट्रेटने असे आदेश दिलेत. तसेच बर्दवान जिल्हा प्रशासनाने या आदेशांच्या प्रती तेल कंपन्यांनाही पाठवल्यात.