नोट बंदीमुळे संसदेचे कामकाज गेलं पाण्यात....

नोटबंदीच्या मुद्यावरुन संसदेचं दुस-या दिवसाचं कामकाज पाण्यात गेलंय. विरोधकांच्या गोंधळामुऴं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 

Updated: Nov 17, 2016, 05:05 PM IST
नोट बंदीमुळे संसदेचे कामकाज गेलं पाण्यात....  title=

नवी दिल्ली : नोटबंदीच्या मुद्यावरुन संसदेचं दुस-या दिवसाचं कामकाज पाण्यात गेलंय. विरोधकांच्या गोंधळामुऴं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 

संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. लोकसभेत काँग्रेसनं स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली. मात्र ही मागणी लोकसभाध्यक्षांनी फेटाळून लावली. काँग्रेस खासदारांचा गोंधळ सुरूच होता. मात्र सुमित्रा महाजन यांनी प्रश्नोत्तराचा तास कसाबसा रेटून नेला. मात्र त्यानंतर त्यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.  

दुसरीकडे राज्यसभेतही नोटाबंदीवरुन जोरदार गोंधळ झाला. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः राज्यसभेत येऊन यावर उत्तर द्यावे अशी मागणी विरोधकांनी राज्यसभेत केली. या मागणीसाठी विरोधकांनी गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज चार वेळा तहकूब केल्यानंतर अखेर दिवसभरासाठीच स्थगित करण्यात आलं.