नवी दिल्ली : 16 तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत सुरू रहावं, यासाठी हा प्रयत्न आहे. मात्र नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद या अधिवेशनात उमटणार, हे नक्की... कारण या बैठकीपूर्वीच काँग्रेससह 7 विरोधी पक्षांनी बैठक घेऊन आपली रणनीती ठरवली.
तृणमूल, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, भाकपा, माकपा, झारखंड मुक्ती मोर्चा आणि YSR काँग्रेस या पक्षांचे नेते सहभागी झाले होते. तर दुसरीकडे भाजपानंही आपल्या सहकारी पक्षांची बैठक बोलावली. NDAमधल्या सर्व पक्षांचा नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचा दावा भाजपनं केलाय.