घरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 13, 2014, 10:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.
सध्याच्या किमतीनुसारच ग्राहकांना सिलिंडर वितरित करण्यात येणार आहे. अतिरिक्त कोणताही बोझा ग्राहकांवर लादला जाणार नाही. सबसिडीसह सिलिंडर आहे त्याच किमतीत ग्राहकांना वितरित करण्यात येणार आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीसंदर्भात विचारले असता, हा एक मोठा विषय असून केंद्र सरकार त्यावर गांभीर्यानं विचार करीत आहे, असंही प्रधान यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं.
`आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या भावाच्या तंत्रानुसार वाढलेल्या पेट्रोलच्या किमती २००६ पासून मर्यादेच्या बाहेर गेल्या आहेत. सबसिडीमुळं डिझेलच्या किमती सध्या तरी आवाक्यात आहेत. देशात गॅस आणि इंधन उत्पादनात वाढ करण्याची गरज आहे. सरकार, शेतकरी आणि गरीब नागरिकांच्या हिताचं धोरण आखणार आहे,` असं ते म्हणाले.
बिहारमध्ये इंधन आणि गॅसची साठा करण्यासाठी प्रधान यांची इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी बैठक आयोजित करण्यात आली होती. इतर राज्यांच्या मानानं बिहारमध्ये एलपीजीची कमतरता भासत आहेत. इतर राज्यातील प्रमाण हे ४५ ते ५० टक्के असून बिहारमध्ये ते २६ टक्के आहे. हलदिया ते जगदीशपूर दरम्यान होणाऱ्या गॅस पाइपलाइनसह त्यांनी बिहारमधील बरौनी रिफायनरीची सध्याची स्थिती यावरही बैठकीत चर्चा केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.