नीतीश कुमार X नरेंद्र मोदी

2014च्या निवडणुकांपूर्वी नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं युद्ध तेजीत आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. सांप्रदायिकतेनंतर आता विकासाच्या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 17, 2013, 11:23 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
2014च्या निवडणुकांपूर्वी नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं युद्ध तेजीत आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. सांप्रदायिकतेनंतर आता विकासाच्या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे.
या दोन्ही नेत्यांचं राजकारण विकासावर सुरु आहे. विकासाच्या मुद्द्यानेच नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातील दरी अधिक रुंद केलीय. एकीकडे अमेरिकेत नरेंद्र मोदींनी गुजारतचे विकासाचे मॉडेल हेच जगातील सर्वाधिक चांगले मॉडेल असल्याचा दावा केलाय. तर नितीश यांनी बिहारचं विकासाचं मॉडेल हेच खरं मॉडेल असल्याचं सांगत मोदींना खुलं आव्हान दिलय.
मढाचा मुद्दा केवळ विकासच नाहीये. एनडीएत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन मोदी आणि नितीशकुमारांमध्ये रस्सीखेच आहे. दोन्हीही नेते राज्याच्या राजकारणातून बाहेर पडून आपली उंची वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत.

या दोन्ही नेत्यांमधील युद्ध वाढीस लागलेलं असताना, त्यांच्यासंमोरील अडचणीतही तेवढीच भर पडतेय. पक्षातील नेत्यांबरोबरच घटक पक्षांनाही साथीला घेणं हे मोदींपुढचं मोठं आव्हान आहे. तर एनडीए सोडून, केंद्राच्या राजकारणात स्वतःच अस्तित्व निर्माण करणं हे नितीशकुमार यांना अवघड जाणार आहे.