www.24taas.com, चेन्नई
युपीए-२ सरकार पुन्हा अडचणीत आलं आहे. युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा द्रमुकनं दिला आहे. श्रीलंका प्रश्नावरून यावेळी करुणानिधींनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
श्रीलंकेच्या प्रश्नावर अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात ठराव मांडला होता. या प्रस्तावात दुरुस्ती करण्यास केंद्र सरकार अपयशी ठरलं तर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी दिलाय.
द्रमुक हा युपीए आघाडीचा 2004 पासून घटक पक्ष असून त्यांचे 18 खासदार आहेत. मनमोहन सिंग सरकारमध्ये द्रमुकचे एक कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री आहेत. केंद्र सरकारनं आपली मागणी मान्य न केल्यास हे पाचही मंत्री राजीनामा देतील असा इशारा करुणानिधी यांनी दिलाय.