मुंबई : पाच दिवसांच्या डॉक्टरांच्या संपानंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील डीन अर्थात अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अधिष्ठात्यांना त्यांच्या संस्थेची दोन वेळा पाहणी करावी लागणार आहे. एवढंच नाहीतर या पाहणीची छायाचित्रं मंत्रालयातील संबंधित विभागाला पाठवावी लागणार आहे.
राज्याचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबतचे आदेश दिलेत. या फोटोंमध्ये सर्व आयसीयू, आपत्कालीन कक्ष, प्रवेश, रुग्णालयातील बाहेर पडण्याचा गेट तसंच ड्युटीवरील सुरक्षारक्षक हे सगळं आलं पाहिजे अशी अट घालण्यात आलीये. महापालिका रुग्णालयाच्या डीनला दिवसातून तीनवेळा पाहणी करुन व्हिडीओ बनवण्यास सांगितलंय. डीन ब-याचदा रुग्णालयातील कामकाजात सहभागी होत नाही अशी बाब संपकरी डॉक्टरांच्या संपादरम्यान समोर आल्याचं राजगोपाल देवरा यांनी सांगितलं आहे.