जुलैपासून सुरू होणार नवीन डबल डेकर ट्रेन

 रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच प्रवाशांसाठी नवीन डब्बल डेकर ट्रेन सुरु होणार आहेत. या ट्रेनमध्ये अनेक नवीन सुविधा असणार आहेत. ही ट्रेन ‘उद्य एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणार आहे.

Intern - | Updated: Apr 25, 2017, 10:46 AM IST
जुलैपासून सुरू होणार नवीन डबल डेकर ट्रेन title=

नवी दिल्ली :  रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच प्रवाशांसाठी नवीन डबल डेकर ट्रेन सुरु होणार आहेत. या ट्रेनमध्ये अनेक नवीन सुविधा असणार आहेत. ही ट्रेन ‘उद्य एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणार आहे.

अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त ही ट्रेन जुलैपासून सुरू होणार आहे. या ट्रेनचे भाडेही प्रवाशांना परवडणारे असेल. ३ एसी श्रेणी ट्रेनच्या मानाने या ट्रेनचे भाडे कमी असणार आहे. आरामदायी बैठक व्यवस्था आणि १२० सीटचे एसी डब्बे या ट्रेनमध्ये असणार आहेत. ट्रेनच्या प्रत्येक डब्ब्यात वाय – फाय सेवा देण्यात आली आहे. त्यासोबत एलसीडीसेवाही देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना चहा, जेवण, कोल्ड ड्रिंकची व्यवस्थाही असेल. त्यासाठी स्वयंचलित मशीन बसवण्यात आल्या  आहेत.

ही ट्रेन दिल्ली - लखनऊ सारख्या अधिक मागणी असलेल्या मार्गांवर धावणार आहे. या ट्रेनमध्ये इतर ट्रेनच्या मानाने ४० टक्के अधिक प्रवाशी प्रवास करू शकतात. या ट्रेनमध्ये अनेक सुविधी देण्यात आल्या आहेत परंतु रात्रीची सेवा असल्याने या ट्रेनमध्ये स्लीपर बर्थची सेवा नसणार आहे.

या ट्रेनची घोषणा २०१६ – १७ च्या रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली आहे. ही ट्रेन जुलैमध्ये सुरू होणार असून ती प्रतीतास ११० किलोमिटरच्या वेगाने धावणार असल्याचे सांगण्यात येते.