नक्षलवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलेय. 

Updated: Apr 24, 2017, 09:21 PM IST
नक्षलवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख title=

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलेय. 

या घटनेप्रकरणी मोदींनी दु:ख व्यक्त करत जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे ट्विटरवरुन म्हटलेय. जवानांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच त्यांच्या कुटुंबाचेही सांत्वन केले.

आज नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे २६ जवान शहीद झालेत.