राजस्थान : मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरणात उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले असले तरी राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणी त्याच्यावर अटकेची तलवार कायम आहे.
जोधपुर जिल्ह्यात सलमानवर वेगवेगळ्या ठिकाणी हरणांची शिकार करण्याप्रकरणी तीन आणि शिकारीदरम्यान विनापरवाना शस्त्रांचा वापर करण्याप्रकरणी खटला सुरु आहे. १९९८ मध्ये हम साथ साथ है या चित्रपटासाठी जोधपूर येथे शूटिंगदरम्यान तीन विविध ठिकाणी काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी सलमानविरोधात खटला दाखल करण्यात आलाय.
काळवीट शिकार प्रकरणात सलमानला एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप निर्णय येणे बाकी आहे. त्यामुळे सलमानच्या समस्या काही अजून संपलेल्या नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.