विराट कोहली बनला BSFचा ब्रँड अँबेसिडर

भारताचा फ्युचर कॅप्टन विराट कोहलीच्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला गेलाय. विराट कोहली बीएसएफचा ब्रँड अँबेसिडर झालाय. बीएसएफकडून हा किताब मिळवणारा विराट पहिला क्रिकेटपटूच नाही तर पहिला खेळाडू झालाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 23, 2013, 04:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचा फ्युचर कॅप्टन विराट कोहलीच्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला गेलाय. विराट कोहली बीएसएफचा ब्रँड अँबॅसिडर झालाय. बीएसएफकडून हा किताब मिळवणारा विराट पहिला क्रिकेटपटूच नाही तर पहिला खेळाडू झालाय.
टीम इंडियाचा स्टाईलिश क्रिकेटर विराट कोहली पूर्ण दीड लाखांच्या फौजेचा कॅप्टन बनलाय़. क्रिकेटच्या पीचवर विराटचा शानदार खेळ, त्याची विजीगीषू वृत्ती सर्वांनाच भावते. त्याचमुळे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनेही त्याला आपला ब्रँड ऍम्बॅसिडर बनवलंय.
त्याचमुळे मैदानात आपल्या सहका-यांना सपोर्ट करणारा विराट आता बीएसएफच्या जवानांनाचंही बळ वाढवेल. विराटसाठी ही फार अभिमानाची बाब आहे. याच कार्यक्रमात विराट कोहलीशी संवाद साधण्याची संधी काही बीएसएफ जवानांनाही मिळाली. मौका लेके चौका मारनेवाला विराट बीएसएफ जवानांच्या प्रश्नांवर मात्र क्लिनबोल्ड होताना दिसला
पण विराटलाच ब्रँड ऍम्बॅसिडर करावं असं बीएसएफला का वाटलं? याचं उत्तर अगदी सरळ आहे. टीम इंडियाने दिलेली प्रत्येक कामगिरी विराटने यशस्वीपणे पार पाडलीय. ती कामगिरी यशस्वी केल्याशिवाय विराट गप्प बसला नाही. अगदी असंच ट्रेनिंग बीएसएफच्या जवानांनाही देण्यात येतं. त्यामुळे विराट हाच यंगस्टर्सना बीएसएफकडे अपिल करण्यासाठी योग्य क्रिकेटपटू वाटला
विराट कोहलीच्या डोक्यावर आत्तापर्यंत आपण शानदार टीम इंडियाची कॅप पाहीली आहे. आता ही बीएसएफची कॅपही त्याची शान वाढवत आहे. प्राणांची बाजी लावून आज बीएसएफ जवान देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत, नक्षलवाद्यांशी लढा देत आहे. त्यांना पाठींबा द्यायला विराटसारखाच खंदा वीर पाहfजे यात शंका नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.