दहावीच्या पुस्तकात नक्षलवादी नेताच्या आयुष्यावर धडा

नक्षलवादी विचारसरणी आता जंगली भागापुरतीच सक्रीय राहिलेली नाही, तर शहरी भागात देखील या विचारसरणीची पाळंमुळं पसरत चाललीय... 

Updated: May 4, 2017, 09:43 PM IST
दहावीच्या पुस्तकात नक्षलवादी नेताच्या आयुष्यावर धडा title=

नवी दिल्ली : नक्षलवादी विचारसरणी आता जंगली भागापुरतीच सक्रीय राहिलेली नाही, तर शहरी भागात देखील या विचारसरणीची पाळंमुळं पसरत चाललीय... 

धक्कादायक बाब म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातूनही नक्षलवादी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पसरवले जात असल्याची बाब निदर्शनास आलीय. सीबीएसई पाठ्यक्रमाच्या दहावीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात कुख्यात, जहाल माओवादी नेता किशनजी याचं कौतुक करण्यात आलंय. 

इंग्रजी माध्यमाच्या या पुस्तकात 'अ मॉरल फोर्स इन पॉलिटिक्स' नावाचा धडा आहे. या धड्यात चार महिला ओरिसा राज्यातील एका गावात भेटतात आणि भविष्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करत, किशनजीनं सांगितलेल्या पर्यायी मार्गानं राजकीय निर्मिती करावी असं सांगतात... 

या किशनजीला २४ नोव्हेंबर २०११ ला बंगाल आणि झारखंडच्या सीमेवर चकमकीत ठार करण्यात आलं. त्याचा धडा विद्यार्थ्यांना शिकवला जात असल्याबद्दल भूमकाल या नक्षलविरोधी संस्थेचे अध्यक्ष अरविंद सोवनी यांनी आक्षेप घेतलाय.