नवी दिल्ली : येमेनमध्ये फसलेल्या काही भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे भारतात पोहोचवण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या मदतीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे आभार व्यक्त केले होते. त्यावर शरीफ यांची मुलगी मरियम शरीफनेही मोदींचे आभार मानले आहे.
शरीफ यांची मुलगी मरियम शरीफने ट्विट केले की, भारताच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या आभाराबद्दल धन्यवाद. येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांना घरी पोहोचवल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत.
पंतप्रधान मोदी काल बोलले होते की, पाकिस्तानच्या मदतीने ११ भारतीय भारतात परतले आहेत. पंतप्रधान नवाज शरिफ, तुमच्या या मानवतावादी कृती बद्दल धन्यवाद. माणुसकीसाठी कोणत्याही सीमा नसतात. येमेनमध्ये फसलेल्या अनेक देशांच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचा आम्हाला आनंद आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.