मुंबई : काश्मिर पंडितांचा वाद आता बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या विधानांवरून बॉलिवूडमधील दोन दिग्गज अभिनेत्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत.
‘जी व्यक्ती कधीही काश्मीरात राहिली नाही, ती व्यक्ती काश्मीरी पंडितांसाठी झगडत आहे.' अस म्हणत अभिनेते नसिरूद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांना निशाण्यावर धरले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हंटले. याशिवाय भाजपशासित राज्यांमधल्या अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांवरही नसरुद्दीन शहांनी खेद व्यक्त केला आहे. पण सरकार एवढंही मूर्ख नाही की, ते देशाला अंधकारात ठेवतील, असंही ते म्हणाले.
नसरुद्दीन शाह यांच्या या टीकेला अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले.
अनुपम खेर यांचे ट्वीट- ‘शाह साब की जय हो. तुमच्या तर्कानुसार एनआरआयनी तर भारताबाबत विचारच केला नाही पाहिजे’
त्यावर नसीरूद्दीन शाह यांनी "आपण असे कोणते विधान केलेच नाही. जर मी इतक्या वर्षांत या विषयावर काही बोललो नाही तर आता तरी मी का बोलेन?" असे बोलून आपल्या बोलण्याचा चूकीचाच अर्थ लावला गेल्याचे सांगितले.
Shah Saab ki Jai Ho. By that logic NRI's should not think about India at all.:) Naseeruddin Shah on Anupam Kher https://t.co/UtQrtZ66we
— Anupam Kher (@AnupamPkher) May 27, 2016