नारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध

स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम आणि त्याच्या मुलगा नारायण साई यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता आसाराम आणि त्यांच्या मुलाविरोधात आता आसारामच्या सुनेने तक्रार दाखल केली आहे. 

Updated: Sep 20, 2015, 05:39 PM IST
नारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध title=

इंदूर : स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम आणि त्याच्या मुलगा नारायण साई यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता आसाराम आणि त्यांच्या मुलाविरोधात आता आसारामच्या सुनेने तक्रार दाखल केली आहे. 

 
आसाराम यांचा मुलगा नारायण साई याचे लग्नानंतरही अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवले. अशी तक्रार नारायण साईच्या पत्नीनं केली आहे. त्याचसोबत दोघा पिता-पुत्रांनी अनेक शिष्यांची संपत्तीही हडप केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. अल्पवयीन शिष्येवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सध्या आसाराम तुरुंगात आहे. तर त्याच्या मुलावरही गंभीर आरोप आहेत.
 
आपल्या आई वडिलांचाही संपत्ती नारायण साईने हडप केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच केस मागे घेण्यासाठी आपल्याला फोनवरुन धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप तिने केला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.