पीडित मुलीसमोर आसारामची चौकशी...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात सध्या पोलीस कोठडीत असलेल्या कथावाचक आसाराम बापूची आज पीडित मुलीसमोर चौकशी करण्यात येतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 17, 2013, 05:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात सध्या पोलीस कोठडीत असलेल्या कथावाचक आसाराम बापूची आज पीडित मुलीसमोर चौकशी करण्यात येतेय. अधिक तपासासाठी पोलीस आसारामला घेऊन शांति वाटिकेलाही जाणार आहेत. याच शांतिवाटिकेत पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. तर, दुसरीकडे आसारामनं पौरुषत्व चाचणी करण्यासाठी नकार दिलाय.
आसारामला मेडिकल चाचणीसाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पीटलचे अधीक्षक डॉक्टर एम. एम. प्रभाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आसारामला विविध चाचण्यांसाठी हॉस्पीटलमध्ये आणण्यात आलं होतं. परंतु, त्यांनी डॉक्टरांना सहकार्य न केल्यामुळे पोलीस त्यांना घेऊन परत गेले’.
याअगोदर आसारामनं आजारी असल्याचं कारण पुढे करत टेस्ट करण्यासाठी नकार दिला होता. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जोधपूर पोलीस याआधी आसारामची पौरुषत्व चाचणी केलीय. यामध्ये ते एकदम फिट असल्याचं समोर आलं होतं. या चाचण्यांचे रिपोर्ट ‘एसआयटी’ आसाराम यांच्याविरुद्ध करू शकते.
बुधवारी, अहमदाबादमध्ये दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मुख्यालयात आपल्या वकिलांसमोर आसाराम धाय मोकलून रडू लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएस कार्यालयात आसारामनं आपल्या वकिलांना ‘आपण आत्तापर्यंत इतक्या विवंचनेत कधीच नव्हतो, मला या प्रकरणातून लवकरात लवकर बाहेर काढा’ असं म्हटलंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, आसारामनं त्यांच्यावर आरोप करणाऱ्या दोन्ही बहिणींना आपण ओळखत असल्याचं कबूल केलंय. आपण त्यांना चांगलं वक्ता बनवणार होतो, असं आसारामनं पोलिसांसमोर म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.