नवी दिल्ली : नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (एनडीएमसी) औरंगजेब रोडचं नाव बदलून माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा निर्णय अंमलात आणलाय. परंतु, काही मुस्लीम संघटनांनी या निर्णयाचा विरोध केलाय.
इतिहासाची मोडतोड करून शहरं आणि रस्त्यांची नाव बदलण्याचा ट्रेन्ड सुरू असल्याचा आरोप या मुस्लिम संघटनांनी केलाय. वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सय्यद कासिम रसूल इलियास यांच्या म्हणण्यानुसार, 'हा एक विचारपूर्वक केलेला प्रयत्न आहे... आणि हा प्रयत्न इथेच थांबणारा नाही'.
सय्यद यांच्या म्हणण्यानुसार, अब्दुल कलाम आज जिवंत असते तर भाजप सरकारचा हा निर्णय त्यांनाही रुचला नसता.
उल्लेखनीय म्हणजे, अब्दुल कलाम यांचं नाव रस्त्याला दिल्यानंतर तात्काळ शिवसेनेनं महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदल्याच्या आपल्या मागणीला जोर दिलाय. औरंगाबादमध्येच मुघल शासक औरंगजेबाची कबर आहे.
'मुघल शासक औरंगजेब हिंदूविरोधी नव्हते, ते एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती होते' असं सय्यद यांचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.