मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी जनार्दन चांदूरकरांची वर्णी

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चांदूरकर हे सुनील दत्त यांचे निकटवर्तीय मानले जायचे.

Updated: Apr 4, 2013, 03:58 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चांदूरकर हे सुनील दत्त यांचे निकटवर्तीय मानले जायचे. गुरुदास कामत यांच्या गटाचे भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांची नावंही चर्चेत होती. त्याचबरोबर मिलिंद देवरा गटाच्या मधू चव्हाणांचं नावंही अध्यक्षपदाच्या चर्चेत होतं. जनार्दन चांदूरकर हे दोन्ही गटांपासून दूर होते. म्हणूनच अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याचं समजतंय. मुंबई शहर काँग्रेसपदावरुन कृपाशंकर सिंह यांच्या गच्छंतीनंतर आता नवे अध्यक्ष म्हणून जनार्दन चांदूरकर हे पदभार स्विकारणार आहेत.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी मराठी चेह-याचा विचार होण्याची शक्यता होती. विधान परिषद सदस्य आणि प्रवक्ते भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, आणि काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर यांची नावे आघाडीवर सुरवातीपासूनच आघाडीवर होती. जर्नादर चांदूरकर आणि चंद्रकांत हंडोर हे दोघेही मागासवर्गीय समाजातील आहेत.

चांदूरकर यांच्याकडे मराठी आणि दलित चेहरा म्हणूनही काँग्रेसमध्ये पाहिलं जातं. उच्चशिक्षीत असल्याने चांदूरकरांची नावाला पसंती देण्यात आल्याचे समजते. तर अमराठी चेह-यांमध्ये काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबईच्या खासदार प्रिया दत्त यांचं नावही चर्चेत होतं.