मुंबई : वसईचा एक १४ वर्षाचा मुलगा जम्मू-काश्मिरातील दहशदवादांविरोधात लढण्यासाठी घरातून निघाला. पण त्याचं हे स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलं. गुजरात पोलिसांनी त्याला तसं करण्यापासून रोखलं. १५ ऑगस्टला पुन्हा त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आलं.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार १० वीमध्ये शिकणारा निर्मल वाघ मुंबई सेंट्रलवरुन अमृतसर जाण्यासाठी निघाला. रात्री ९.३० मिनिटांनी तो गोल्डन टेंम्पल या ट्रेनमध्ये बसला. पण रात्री १.३० वाजता तिकीट नसल्याने त्याला टीसीने सुरत स्थानकावर उतरवलं.
वसईच्या पोलिसांनी त्याला शोधून काढलं. त्याच्याकडे ट्युशन फीसाठी दिलेले २५०० रुपयांशिवाय आणखी काही नव्हतं. पण त्याच्याशी संपर्क करण्यासाठी काहीही साधण नव्हतं.