गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यास नकवींचा पाठिंबा

 भगवत गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याचा प्रस्ताव सुषमा स्वराज यांनी ठेवल्यानंतर टीएमसीनंतर आता बीएसपी सुप्रीमो मायावती यांनीही टीकेची झोड उठवली आहे.

Updated: Dec 8, 2014, 10:09 PM IST
गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यास नकवींचा पाठिंबा title=

नवी दिल्ली :  भगवत गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याचा प्रस्ताव सुषमा स्वराज यांनी ठेवल्यानंतर टीएमसीनंतर आता बीएसपी सुप्रीमो मायावती यांनीही टीकेची झोड उठवली आहे.

मायावती यांनी लोकसभेत म्हटले आहे की, सुषमा स्वराज यांनी राज्य घटनेबद्दल विचार केला पाहिजे. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की आपला देश विविध धर्मांमध्ये आस्था आहेत. यामुळे दुसऱ्या धर्मातील लोकही त्याच्या धार्मिक ग्रंथांनीही राष्ट्रीय ग्रंथ घोषीत करण्याची मागणी करू शकतात. 

सीपीआय नेते डी राजा यांनी सुषमा यांच्या वक्तव्यावर टीका करताना सांगितले की, मी मंत्रीच्या वक्तव्याचे मी निंदा करते. हे वक्तव्य भारताच्या धर्मनिरपेक्षतेविरोधात आहे. 

दरम्यान सुषमा स्वराज यांना त्यांच्या पक्षाचे मंत्री आणि पक्षाचे मुस्लिम चेहरा मुख्तार अब्बास नकवी यांनी समर्थन केले आहे. नकवी म्हणाले, सुषमा स्वराज यांनी केलेले वक्तव्य चुकीचे नाही. यावर चर्चा व्हायला हवी यात काही चुकीचे नाही. 

सुषमा स्वराज यांच्या वक्तव्यावर शिवसेनाने समर्थन केले आहे. अनंत गीते यांनी सांगितले की, मी सुषमा स्वराज यांच्याशी सहमत आहे. सरकारने भगवत गीतेले राष्ट्रीय ग्रंथ घोषीत केले पाहिजे. 

भगवत गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषीत केली पाहिजे, आता असे करण्याची औपचारिकता बाकी आहे. 

सुषमा 'गीता च्या ५१५१ वर्ष पूर्ती'च्या लाल किल्लावर आयोजित कार्यक्रमात 'गीता प्रेम महोत्सवाला संबोधित करताना सुषमा स्वराज यांनी वरील वक्तव्य केले होते. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी मागणी केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करावे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.