देशातील सर्वात युवा खासदाराचा साखरपुडा

देशातील सर्वात युवा खासदार आणि इंडियन नॅशनल लोकदल पक्षाचे नेता नेता दुष्यंत चौटाला यांचा मंगळवारी मेघना अहलावत हिच्यासोबत साखरपुडा झाला. गुडगावमधील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला.

Bollywood Life | Updated: Jan 4, 2017, 01:52 PM IST
देशातील सर्वात युवा खासदाराचा साखरपुडा title=

गुडगाव : देशातील सर्वात युवा खासदार आणि इंडियन नॅशनल लोकदल पक्षाचे नेता नेता दुष्यंत चौटाला यांचा मंगळवारी मेघना अहलावत हिच्यासोबत साखरपुडा झाला. गुडगावमधील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला.

हॉटेलमध्ये फक्त चौटाला आणि अहलावत कुटुंबियातील ४० ते ४५ लोकं उपस्थित होते. पक्षाच्या कोणत्याही नेत्याला यासाठी आमंत्रण नव्हतं. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि माजी खासदार अजय सिंह चौटाला एक दिवसाचा पॅरोल घेऊन या कार्यक्रमात सहभागी झाले.

मेघना अहलावत आयजी परमजीत सिंह अहलावत यांची मुलगी आहे. तिने मसूरीमध्ये एमबीए केलं आहे. सीनियर आयपीएस अहलावत हे सध्या पंचकुलामध्ये टेलीकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत.