मोदींच्या मातोश्री पहिल्यांदाच पंतप्रधान बंगल्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या आई सोबत घालवलेल्या मौल्यवान क्षणांची छायचित्र ट्विटरवर शेअर केली.

Updated: May 15, 2016, 08:33 PM IST
मोदींच्या मातोश्री पहिल्यांदाच पंतप्रधान बंगल्यावर title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या आई सोबत घालवलेल्या मौल्यवान क्षणांची छायचित्र ट्विटरवर शेअर केली. मोदींनी स्वतः त्यांच्या मातोश्रींना त्यांच्या निवासस्थानी असणाऱ्या बगीचाचा फेरफटका घडवून आणला. 

मोदी पंतप्रधान म्हणून निवडून येण्याला आता उद्या दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. 16 मे 2014 रोजी मोदींच्या नेतृत्वात भाजपला लोकसभेत पूर्ण बहुमत मिळालं. 

तेव्हापासून मोदींनी गुजरात सोडून दिल्लीतल्या 7 रेसकोर्स रोडवरच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी बिऱ्हाड हलवलं. त्यानंतर प्रथमच मोदींच्या मातोश्री दिल्लीत आल्या होत्या.

आज त्या पुन्हा गुजरातला रवाना झाल्या. बऱ्याच दिवसांनी आपल्या आईसोबत मौल्यवान वेळ घालवता आल्याचा आनंद यानिमित्तानं पंतप्रधानांनी ट्वीटरवर व्यक्त केला.