खूशखबर! काळा पैशातून सरकार करणार गरीबांचं भलं

नोटबंदीनंतर काळा पैसा जमा करणाऱ्या लोकांना पंतप्रधान मोदी आणखी एक संधी देत आहेत. मोदी सरकारने म्हटलं आहे की, जर कोणाकडे काळा पैसा असेल आणि त्याने जर त्याबाबतची माहिती सरकारला दिली तर दंडाच्या रुपात काही रक्कम घेऊन होणारी शिक्षा कमी केली जाईल.

Updated: Nov 28, 2016, 04:37 PM IST
खूशखबर! काळा पैशातून सरकार करणार गरीबांचं भलं title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळा पैसा जमा करणाऱ्या लोकांना पंतप्रधान मोदी आणखी एक संधी देत आहेत. मोदी सरकारने म्हटलं आहे की, जर कोणाकडे काळा पैसा असेल आणि त्याने जर त्याबाबतची माहिती सरकारला दिली तर दंडाच्या रुपात काही रक्कम घेऊन होणारी शिक्षा कमी केली जाईल.

सरकारकडून सांगण्यात आलं आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण योजनाअंतर्गत काही ३० टक्के राशी ही टॅक्सच्या रुपात जमा कारवी लागेल. उत्पन्नावर १० टक्के दंड आकारला जाईल. तर टॅक्सवर ३३ टक्के सरचार्ज घेतला जाईल. त्यासोबतच २५ टक्के रक्कम सरकारला द्यावी लागेल. ती रक्कम सरकार गरीबांच्या भल्यासाठी वापरणार आहेत.

उदाहरण :

जर तुमच्याकडे १०० रुपये आहेत तर त्यामधले ३० रुपये टॅक्सच्या रुपात द्यावे लागतील. 

-१० रुपये त्यावर दंड आकारण्यात येईल.

- ९ रुपये ९० पैसे सरचार्जच्या रुपात द्यावी लागेल. जी टॅक्सच्या ३३ टक्के असेल.

- यासोबतच १०० रुपयामधले ४९.९० पैसे सरकार टॅक्स, दंड आणि सरचार्जच्या रुपात घेईल.

- १०० रुपयामधले २५ रुपये सरकार आपल्याजवळ नाही ठेवणार. ही रक्कम गरीब कल्याण योजनेत लावली जाईल. सरकार ही २५ रुपये ४ वर्षानंतर पुन्हा देईल. पण यावर कोणतंही व्याज नाही दिलं जाणार.

एकूण सरकार १०० रुपयांच्या बदल्यात २५ रुपये १० पैसे परत देईल.