नवी दिल्ली : नोटबंदीनंतर सरकार एटीएम आणि बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागत असल्याने सरकारने त्यापासून लोकांना दिलासा मिळावा म्हणून अनेक प्रयत्न करत आहेत. लोकांना दिलासा मिळावा म्हणून अनेक वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. अशातच टॅक्सी सर्विस देणाऱ्या OLA कंपनीने मोबाइल एटीएम सर्विस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता तुम्ही ओलाच्या काही टॅक्सीमधून डेबिट कार्डच्या आधारे कॅश काढू शकता. यासाठी ओला कंपनीने भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेसोबत करार केला आहे. OLA ने पायलट प्रोजेक्टच्या रुपात ही सर्विस कोलकातामध्ये सुरु केली आहे. पीएनबी आणि हैदराबादमध्ये में एसबीआय आणि आंध्रा बँसोबत ही सेवा सुरु केली होती. OLAच्या कॅबमध्ये पीओएस मशीनच्या माध्यमातून आता २००० रुपये काढता येणार आहेत.
सरकारने याआधी पेट्रोल पंप आणि बिगबाजार रिटेल स्टोर्समध्ये देखील पैशे काढण्याची सुविधा सुरु केली आहे. ओला लवकरच वेगवेगळ्या शहरांमध्ये ही सुविधा सुरु करणार आहे.