www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदींनी ट्विटरवर फॉलोअर्सच्या स्पर्धेत पहिले स्थान मिळवलयं. त्यांनी या स्पर्धेत मनुष्यबळ विकास मंत्री शशी थरुर यांनाही मागे टाकलंय. थरुर यांच्या ट्विटरवर १८ लाख २१ हजार ५६२ फॉलोअर्स आहेत. मात्र, १८ लाख २५ हजार ११५ फॉलोअर्ससहीत नरेंद्र मोदींनी पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलंय.
राजकारण्यांमध्ये सुषमा स्वराज यांचा भाजपा नेत्यांमध्ये ट्विटरसाठी दुसरा नंबर लागतो. त्यांचे ५ लाख २२ हजार ९७२ फॉलोअर्स आहेत आणि विशेष म्हणजे ट्विटरवर त्या कोणाला फॉलो करत नाही. तर मोदी ३७३ लोकांना फॉलो करतात ज्यात त्यांच्या पक्षाचे काही नेते, काही पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच, थरुर ही ३९२ लोकांना फ़ॉलो करतात. त्यांच्या या यादीत काही विदेशी नेते, विदेशी बाबींचे जाणकार आणि काही काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.
भारताचे पंतप्रधानही या यादीत मागे आहेत. त्यांचे फक्त ६ लाख ३७ हजार २५७ फॉलोअर्स आहेत तर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना ट्विटरवर ४ लाख ११ हजार ९७४ लोक फॉलो करतात. फॉलोअर्सच्या बाबतीत केजरीवाल यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही मागे टाकलंय, अशी चर्चा होत होती. त्यासाठी ही आकडेवारी जाहीर करण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.