मोबाईल इंटरनेट दरांत 100 टक्के वाढ!

जून - सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम ऑपरेटर्सनं संपूर्ण देशात मोबाईल इंटरनेटच्या दरांत 100 टक्के  वाढ केल्याचं समोर आलंय.

Updated: Oct 6, 2014, 04:57 PM IST
मोबाईल इंटरनेट दरांत 100 टक्के वाढ! title=

नवी दिल्ली : जून - सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम ऑपरेटर्सनं संपूर्ण देशात मोबाईल इंटरनेटच्या दरांत 100 टक्के  वाढ केल्याचं समोर आलंय.

यामध्ये, ग्राहकांवर सर्वात जास्त दरवाढ लादलीय ती एअरटेल या मोबाईल कंपनीनं... एअरटेलनं मोबाईल इंटरनेट दरांमध्ये 33 टक्क्यांनी वाढ केलीय. व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांनीही आपल्या दरांत वाढ केलीय. भारतीय मार्केटमध्ये तीन कंपन्यांकडे जवळपास 57 टक्के ग्राहक आहेत. 

एअरटेल आणि आयडिया यांनी यासंबंधी कोणतीही जाहीर वाच्यता केलेली नाही. तर व्होडोफोननं, आपण दोन महिन्यांपूर्वी टूजी प्लानचा बेस टॅरिफ केल्याचं म्हटलंय. व्होडाफोननं एक जीबीच्या इंटरनेट पॅकची किंमत 155 रुपयांवरून वाढवून 175 रुपये केलीय. एअरटेल आणि आयडियानंही टू जी मोबाईल इंटरनेट पॅकच्या किंमती वाढवून याच स्तरावर आणल्यात. 

किंमती वाढविल्यानंतर टेलिकॉम ऑपरेटर्स यासंबंधी आपल्या वेबसाईटवर सूचना देतात. तसंच पोस्टपेड ग्राहकांना एसएमएस पाठवूनही याबद्दलची माहिती दिली जाते. महत्त्वाचं म्हणजे, ट्रायच्या नियमांनुसार, दरांमध्ये बदल झाल्यास टेलिकॉम ऑपरेटर्सनं याबद्दलची माहिती आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवणं बंधनकारक आहे. 

व्होडाफोन आणि आयडियानं रँक रेटमध्ये वाढ करून जवळपास 100 टक्क्यांपर्यंत दर वाढवलेत. याअगोदर डेटा पॅक नसेल तर नेट वापरला तर 10 केबीच्या वापरावर 2 पैसे ग्राहकांना चार्ज लागत होता तोच आता 10 केबीसाठी 4 पैसे द्यावे लागतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.