जन-धन खात्यांची गिनीज बुकमध्ये नोंद

जन-धन खात्यांची जन-धन खात्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने हा विक्रम केल्याचे गिनीज बुकच्या सन्मानपत्रात म्हटले आहे.

Updated: Jan 21, 2015, 10:15 AM IST
जन-धन खात्यांची गिनीज बुकमध्ये नोंद title=

नवी दिल्ली : जन-धन खात्यांची जन-धन खात्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने हा विक्रम केल्याचे गिनीज बुकच्या सन्मानपत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत ११.५ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. १० कोटी या निर्धारित लक्ष्यापेक्षा यात मुदतीआधीच वाढ नोंदली गेली. देशातील ९९.७४ टक्के कुटुंबांकडे बँक खाते असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलाय. २३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०१४ या आठवड्यात पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत १८,०९६,१३० बँक खाती उघडण्यात आली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्टमध्ये या योजनेचा शुभारंभ केला तेव्हा येत्या २६ जानेवारीपर्यंत ७.५ कोटी बँक खाती उघडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. पुढे हे लक्ष वाढवून १० कोटी करण्यात आले. एकट्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ९.११ कोटी खाती उघडली आहेत. यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांचा क्रमांक राहिला.

देशातील काही टक्के लोकसंख्येकडेच आता बँक खाती नाहीत. या खात्यात संबंधित ग्राहकांकडून सुमारे ९,०३१ कोटी रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जेटली यांनी दिली. बँकांनी १६ जानेवारीपर्यंत देशभरात ११.४३ कोटी खाती उघडली. यापैकी ८.२४ कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.