नवी दिल्ली: दिल्लीच्या द्वारका विभागात राहणाऱ्या एका विवाहितेवर सोमवारी रात्री चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सोमवारी रात्री काही पैशांचा व्यवहार करण्यासाठी ही महिला गेस्ट हाउसवर गेली होती.
पैसे परत देण्याऐवजी त्या चार नराधमांनी तिच्यासोबत गैरव्यवहार करण्यास सुरूवात केली.
त्यानंतर बलात्कार करून ते फरार झाले.
त्या चार इसमांपैकी विकास, अनिल आणि रमेश या तिघांना अटक झाली असून एक इसम फरार आहे.
त्याचा शोध सध्या चालू असल्याचा पोलिसांनी म्हंटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.