बॅनरमुळे त्याच ठरलेले लग्न मोडले

हल्ली लग्न ठरलं की लग्नाचे बॅनर लावण्याची पद्धत ठिकठिकाणी सुरु झालीये. बॅनरवर वधू-वरांचे फोटो लावले जातात. मात्र ही बॅनरबाजी या मुलाला चांगलीच महागात पडली. 

Updated: Aug 24, 2016, 04:00 PM IST
बॅनरमुळे त्याच ठरलेले लग्न मोडले title=

तिरुवन्नमुलाई : हल्ली लग्न ठरलं की लग्नाचे बॅनर लावण्याची पद्धत ठिकठिकाणी सुरु झालीये. बॅनरवर वधू-वरांचे फोटो लावले जातात. मात्र ही बॅनरबाजी या मुलाला चांगलीच महागात पडली. 

लग्न अवघे काही तासांवर आले होते मात्र त्याचवेळी मुलाला एड्स असल्याचे तिच्या होणाऱ्या पत्नीला समजले आणि तात्काळ तिने लग्न मोडले. तिरुवन्नमुलाई येथे हा सर्व प्रकार घडला. 

लग्नाची सर्व तयारी झाली होती. लग्नासाठी वधू-वरांचे फोटो असलेले बॅनर अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. मात्र त्याचवेळी बॅनरवरील वरमुलाला एड्स असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती एका व्यक्तीने तेथील जिल्हाधिकाऱ्यांना दिली. 

जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने या वृत्ताची तपासणी केली असता त्या मुलावर खरोखरच उपचार सुरु असल्याचे समोर आले. त्यांनी मुलीकडच्यांना फोन करुन हा प्रकार सांगितला. मात्र त्यावेळी त्यांचा विश्वास बसला नाही. त्यामुळे तहसीलदारांनी तातडीने नवऱ्या मुलीच्या घरी धाव घेतली आणि संपूर्ण माहिती दिली. त्यावेळी मुलीने ठरलेले लग्न मोडण्याचा निर्णय़ घेतला.