नव्या महाराष्ट्र सदनातील गैरसोयी, मुनगंटीवारांना फटका

राजधानीतल्या नव्या महाराष्ट्र सदनामधल्या गैरसोयींबद्दल सातत्यानं तक्रारी येत असतात. मात्र आज खुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच फटका बसल्याचं समोर आलंय.

Updated: Aug 24, 2016, 11:17 AM IST
नव्या महाराष्ट्र सदनातील गैरसोयी, मुनगंटीवारांना फटका title=

नवी दिल्ली : राजधानीतल्या नव्या महाराष्ट्र सदनामधल्या गैरसोयींबद्दल सातत्यानं तक्रारी येत असतात. मात्र आज खुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच फटका बसल्याचं समोर आलंय.

संतापलेल्या मुनगंटीवारांनी थेट लेखी तक्रार केलीये. भाजपच्या सूकाणू समितीच्या बैठकीसाठी मुनगंटीवार राज्यातल्या अन्य मंत्र्यांच्यासह दिल्लीला आले होते. 

दिवसभराची बैठक संपवून रात्री नऊच्या सुमारास ते महाराष्ट्र सदनात पोचले. त्यांना निघण्याची घाई होती. मात्र नेमकी कोणती खोली दिली आहे, याबद्दल मोठा गोंधळ होता. त्यातच तिथं कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. 

इकडून तिकडून खोली शोधत जावं लागल्यानं मुनगंटीवारांचा पाराच चढला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी सदन सोडलं आणि जाता जाता स्वागतकक्षातील नोंदवहीत तक्रार नोंदवली.