नवी दिल्ली : भारतीय सैन्यानं असं काम केलंय ज्यामुळं सर्व भारतीयांचा उर अभिमानानं भरून आलाय. जवानांनी पहिल्यांदा देशाबाहेर जावून मोठी कारवाई केलीय. म्यानमारच्या सैन्यासोबत संयुक्त कारवाई करत दशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि मणिपूर हल्ल्याचा बदला घेतला.
मणिपूरच्या चंदेडमध्ये ४ जूनला भारतीय सैन्याच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यालाच प्रत्युत्तर देत सैन्यानं ही कारवाई केली. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते.
म्यानमारमध्ये भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांच्या दोन ठिकाणांवर हल्ला करुन त्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची देशाबाहेरील ही पहिलीच कारवाई आहे. विशेष म्हणजे या कारवाईमध्ये भारतीय सैन्यावर हल्ला करणारा तो दहशतवादीही ठार झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.