हैदराबादच्या भाविकांवर काळाचा घाला

नांदेड - देगलूर - हैदराबाद महामार्गावरील वल्लाळी टोल नाक्याजवळ काल पहाटे कारचा अपघात झाला. 

Updated: Feb 2, 2016, 08:41 AM IST
हैदराबादच्या भाविकांवर काळाचा घाला title=

हैदराबाद : नांदेड - देगलूर - हैदराबाद महामार्गावरील वल्लाळी टोल नाक्याजवळ काल पहाटे कारचा अपघात झाला. 

हैदराबादमधील भाविक शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन हे सर्व भाविक परतत होते. यावेळी हा भीषण अपघात झाला. 

या अपघातात तीन भाविक जागीच ठार झाले. तर तीन जण जखमी झालेय. कार चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याची माहिती आहे.