पत्नीच्या धमकीला घाबरून पतीने केली आत्महत्या

पत्नीच्या धमकीला घाबरुन पतीने विष घेऊन आत्महत्या केली. हैराण करणारी ही घटना राजधानी दिल्लीत घडलीये.

Updated: Dec 13, 2015, 10:24 AM IST
पत्नीच्या धमकीला घाबरून पतीने केली आत्महत्या title=

नवी दिल्ली : पत्नीच्या धमकीला घाबरुन पतीने विष घेऊन आत्महत्या केली. हैराण करणारी ही घटना राजधानी दिल्लीत घडलीये.

दिल्लीच्या श्रद्धानंद मार्ग अजमेरी गेट येथे राहणाऱ्या शकीलचे आठ वर्षांपूर्वी शहनाज नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर दाम्पत्यांमध्ये वाद सुरु झाला. यामुळे दोघांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्यापासून वेगळे झाल्यानंतर या महिलेने पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा खटला कोर्टात सुरु आहे. सात डिसेंबरला कोर्टाची तारीख होती यासाठी तो कोर्टात गेला होता. यावेळी शहनाज अट मान्य न करणाऱ्या शकीलला धमकावल्याचे शकीलच्या आईने यावेळी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.